top of page

Mutualism began at a very early age. We found out each other's forte and we used it cleverly for our benefit at school. She drew my figures and I would write essays for her. We could fool no one with this adjustment as we had hoped. But the seeds of partnership were sown. Nurturing came with watching films together, hill walks, becoming bench mates to study Indology, visiting near and far away places with curiosity for nature, history, and people, hot debates on a range of topics like what is art and why evolution.  We found great comfort in working together as word-image partners. Eventually, we devised a workshop with the same name- word -image. Children loved it (And so did adults! Parents keep asking, is there one for us as well?) 

 

Today we have worked on several projects together that include books for adults and children, workshops, and online educational programs. The journey continues...we no longer have to mask our own weaknesses in each other's areas of expertise, instead,  we have found a perpetual stream of joy in working together. 

 

आम्ही दोघी एकाच शाळेत असण्याचे आम्हाला फायदे जास्त होते की तोटे हे ठरवणं अवघड आहे. ती लहान. चित्रकलेत हुशार. बाई मला म्हणायच्या ‘धाकटया बहिणीकडे बघून तरी जरा चांगलं काढायचा प्रयत्न कर’! ही गोष्ट ‘बघून’ कशी येणार होती ते मला तेंव्हाही उमजलं नव्हतं. काही काळाने मी प्रयत्न सोडला. आणि परिस्थितीचा फायदा घ्यायचे ठरवले. माझ्या प्रयोग वहीतील आकृत्या काढण्याचे काम तिची चित्रकला चांगली असल्यानं मी तिला सांगायचे ठरवलं. ती नाही म्हणाली नाही. प्रयोगवहीत बेडकाची आकृती काढायची होती. तिनं ती उत्तम काढली असणार हे मला माहीतच होतं. मी घरी वही उघडून बघण्याचेही कष्ट घेतले नाहीत. वर्गात जाऊन तासाला वही उघडून बघते तर काय, आकृतीच्या पानावर एक बेडून नुकताच अंघोळ करून तळ्याच्या काठावर येऊन बसला आहे अशी ‘आकृती’! बेडकाचा हसरा चेहेरा, ओघळणारे पाणी आणि तळ्यातली कमळं बघून मी वही मिटली. ही ‘आकृती’ मी बाईंना कशी दाखवणार होते?

पुढच्यावेळी हृदय काढण्याची वेळ आली. ‘नीट आकृती काढ’ असे मी तिला बजावलं. हृदय बेडकाप्रमाणे नसल्यामुळे सारं काही ठीक होईल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात तिनं ते हृदय धडकताना दाखवलं. बाईंनी ही चोरी पकडलीच. ‘आता तरी बहिणीकडून आकृत्या काढून घेऊ नकोस!’ त्या म्हणाल्या. मी घरी येऊन ‘असं का केलंस’ असं तिला विचारलं. हृदय धडकताना दाखविण्याची काय गरज होती? तर ती म्हणाली, ‘धडकत नसेल तर हृदयाचा काय उपयोग.’

बाकी काही नसले तरी चालेल पण धडकणारे जिते जागते हृदय पाहिजे हे मला तेंव्हा पटलं ते पटलंच!

तेंव्हापासून ती तिची वाट चालते आहेस. दोन वेगळ्या पाउलवाटांवरून चालताना आमच्या लक्षात आलं की या वाटांना जोडणारे कितीतरी सुंदर पूल आहेत. त्यातून जन्माला आली किती तरी गोष्टी, चित्रं, मुलांसोबतचं एकत्र काम आणि शब्द-चित्र कार्यशाळा सुद्धा.

या लिंक मधे कार्यशाळेविषयी मराठीतून माहिती मिळेल : https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4975085645553029040

 

 

Word-Image Workshop

The workshop is designed for children to help and enrich their understanding of the fascinating worlds of words and images.

Word Image is an open-ended, process-driven platform wherein everybody has something to offer and to learn regarding words, images, and the bridges between the two. It aims at resolving the tension between words and visuals by understanding their nature, function, and effects. The workshop is open for children between the age of 8 to 14.  

 

bottom of page