BUY PRATIK ON AMAZON:
https://www.amazon.in/Pratik-Mrunalini-Vanarase/dp/B07MYLCLRR
प्रतीक
ही गोष्ट एका पुरातन नाण्याची आहे. ते नाणं ज्याला सापडलं त्या आताच्या काळातल्या लहान मुलाची आहे. नाणं म्हणजे चलन. माणसाने निर्माण केलेल्या आणि माणसाला चालविणा-या, नव्हे पळवणा-या, या अद्भुत वस्तूची ओळख एका लहान मुलाच्या दृष्टीने करून घ्यायची ठरवली तर काय काय दिसतं? डोंगराच्या कुशीतलं त्याचं गाव, घर, ओढा, शेत एका सावटाखाली आहे. दूर शहर गावातल्या घरांसाठी त्याच्या गावातली माती जाते आहे, पाणी जाते आहे. नशीब काढायचा तोच एक रस्ता आहे असं त्याला चारी बाजूंनी ऐकू येतंय. अशावेळी सापडलेलं कोण्या एकेकाळचं एक नाणं त्याला कोणती वाट दाखवतं? कुठे घेऊन जातं? गोष्ट प्रतीकची… गोष्ट आपली…
Pratik
This is a story of an ancient coin and the boy who stumbles upon it in the present times. Coin is currency. It keeps people going, actually running behind it. If a coin is seen and understood from the point of view of a village boy how would it look? His village nestled in the heart of the mountain, his home, the streams, and the fields are in the shadow of urban development. Soil and water from his village are being dragged to the cities. That’s the only way to prosper, he hears from everywhere. How does an ancient coin that he finds takes him to places in this situation? This is a story of Pratik … a story of all of us..