top of page
apali bhum ani apan.png

आपली भूमी आणि आपण

आपली भूमी  आणि तेथिल नैसर्गिक विविधता हा आपल्या जीविताचा पाया आहे. फार पुरातन काळापासून ही भूमी आपल्याला जगण्यासाठीची साधनसंपत्ती पुरवते आहे. केवळ जीव धरून ठेवण्यासाठी नव्हे तर सुखदायक आणि शाश्वत अस्तित्वासाठी हा नैसर्गिक ठेवा आपल्याला वापरता येईल का असा आपला प्रश्न आहे. भारत हा उष्णकटिबंधीय, नैसर्गिक विविधता प्रधान देश आहे.  इथे निसर्गाने पुरविलेल्या सामग्रीसकट जगणे पृथ्वीवरील इतर काही बिकट प्रदेशांच्या तुलनेने सोपे आहे. तंत्रज्ञानाचा वापर या 'हिताय आणि सुखाय' चिरंजीवी अस्तित्वाच्या उद्दिष्टाने करणे शक्य झाले तर आपला नैसर्गिक वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सुपूर्त करता येईल. आपण आपल्या भूमीशी नेमके कशाप्रकारे जोडले गेलो आहोत याचा 'भूचित्र- सृष्टीव्यवस्था' या दृष्टीकोनातून वेध घेण्यासाठी- आपली भूमी आणि आपण.

APALI BHUMI ANI APAN

Our land and natural diversity here is a foundation of our living. This land has been providing means and resources for survival for a long time. The question is whether we can conserve and use this rich heritage not only to survive but to live happily and sustainably. India is a biodiversity-rich tropical country. It's less difficult to live here with all the nature’s bounty than living in other harsh regions on this planet. If we use technology for joyous and sustainable living, we would be able to pass on our natural heritage to the coming generations. This book has been written to take an overview of how we are connected with the land from the perspective of ‘Landscape Ecology’.

bottom of page